Back

ⓘ साहित्य - संमेलने, महाराष्ट्र साहित्य परिषद, अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, मराठी साहित्य महामंडळ ..                                               

साहित्य संमेलने

बृहन्महाराष्ट्रात आणि अन्यत्रही अनेक मराठी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात; त्यांपैकी काही संमेलनाची ही यादी:- अनुष्का स्त्री-मंच साहित्य संमेलन अभंग साहित्य संमेलन गझल संमेलन ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन चतुरंग रंगसंमेलन प्रबोधन साहित्य संमेलन राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्यसंमेलन पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन स्त्री साहित्य संमेलन गुंफण सद्भावना साहित्य संमेलन प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन अस्मितादर्श साहित्य संमेलन विश्व मराठी साहित्य संमेलन आंबेडकरी युवा साहित्य संमेलन झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन महात्मा फुले साहित्य संमेलन अखिल भारतीय ...

                                               

महाराष्ट्र साहित्य परिषद

म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.

                                               

साहित्य अकादमी

साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना मार्च १२ १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.

                                               

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश फेब्रुवारी ७ १८७८ मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद ...

                                               

ग्रामीण साहित्य संमेलन

ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात. त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने:-- असोदा जळगाव जिल्हा ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव कवि सुधांशु कै.हणमंत नरहर जोशी यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबरजिल्हा सांगली या गावी दरवर्षी औदुंबर साहित्य संमेलन सदानंद साहित्य संमेलन भरते. १९३९ साली कृष्ण ...

                                               

बालकुमार साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन नावाची संस्था बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये स्थापन केली. पुढे २००० साली संस्थेच्या नावातील संमेलन हा शब्द काढून त्याजागी संस्था हा शब्द टाकण्याचाबदल संमत झाला. परंतु धर्मादाय आयुक्तांकडे पाठविलेल्या या बदलाची पूर्तता झाली आहे की नाही याची खातरजमा करून घेतल्याने हा बदल केवळ कागदोपत्रीच राहिला, आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या अनधिकृत नावानेच संस्था काम करीत राहिली. २०१६ सालीया नावातील ’अखिल भारतीय’ हे शब्द काढून टाकण्याचे ठरले आहे; संस्था त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्‍न करीत आहे. काही तांत्रिक कार ...

                                               

मराठी साहित्य महामंडळ

१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, अौरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. Ahjfuskxxnb वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्य ...

                                               

कोकण मराठी साहित्य परिषद

कोकण मराठी साहित्य परिषद. हिची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी, ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी येथे केली. रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५१ जिल्हा साहित्य संमेलने, ४ महिला साहित्य संमेलने आणि १५ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही. कोमसापच्या शाखा असलेली गावे: अंबरनाथ, कणकवली, कल्याण, गुहागर, जव्हार, डहाणू, पावस, भिवंडी, मंडणगड, महाड, मालगुं ...

                                               

महिला साहित्य संमेलने

महिलांचा प्रामुख्याने सहभाग असलेली महिला साहित्य संमेलने अनेक संस्था भरवितात. काही उल्लेखनीय संमेलने: - अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलन अनुष्का महिला कला साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद भरवीत असलेली महिला साहित्य संमेलने उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन ‘पुढचं पाऊल ट्रस्ट’, ‘भरारी प्रकाशन’ आणि ‘ऋजुता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन १३ नोव्हेंबर २०१६ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे झाले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड होत्या. संमेलनादरम्यान साहित्यिका गिरिजा कीर यांचा सन्मान केला गेला. या संमेलनात साहित्यिका माधवी कुंटे यां ...

                                               

पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते.

                                               

अनुकृतीचा सिद्धांत

अनुकृतीचा सिद्धांत हा सॉक्रेटीसचा शिष्य आणि ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो याने सुमारे इ. स. पूर्व २०० वर्षापूर्वी मांडलेला साहित्यसिद्धांत आहे. हा सिद्धांत त्याने त्याच्या पोएटिक्स या ग्रंथात मांडला आहे. तो त्याचा गुरु प्लेटो याने ललित कलेवर घेतलेल्या आक्षेपाचे उत्तर देण्यासाठी मांडला आहे. प्लेटोने त्याच्या रिपब्लिक या ग्रंथात ललितकृतीवर गंभीर आक्षेप घेतला होता. त्याचे उत्तर देण्यासाठी ॲरिस्टॉटलने हा सिद्धांत सांगितला आहे. ‘अनुकृतीच्या सिद्धांता’ला ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोची पार्श्वभूमी आहे. त्याने त्याच्या ‘रिपब्लिक’ या राज्यशास्त्र विषयवरील ग्रंथात ‘आदर्श राज्याची कल्पना’ मांडली. तिच्यात, ‘कल ...

                                               

अपरांत

"अपरा" याचा अर्थ पश्चिम असा होतो, आणि म्हणून पश्चिम दिशेचा "अंत" म्हणजेच अपरांत. भारतातील पश्चिम किनाऱ्यालगतच्या कोकण किनारपट्टीला बौद्धकाळात अपरांत म्हणत, आणि क्वचित आजही कोकणाला अपरांत म्हणतात. या अपरांत भूमीची राजधानी होती शूर्पारक. हिलाच नालासोपारा हे प्रचलित नाव आहे. ही मुळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे, असे सांगितले जाते. नालासोपारा या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे भिक्षापात्र आहे. येथे अनेक बौद्ध कालीन लेणी आणि सम्राट अशोकाने बांधलेला बौद्ध स्तूप आहे. तत: शूर्पारकं देश सागरस्तस्य निर्ममे, सहसा जामदग्नस्य सोपरान्तमहीतलम।. महाभारत शांतिपर्व

                                               

अमृतवेल (कादंबरी)

अमृतवेल ही वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं!" अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई. नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व! एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड ...

                                               

आदिवासी साहित्य संमेलन

ही संमेलने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांनी भरवतात. अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन, आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, दलित आदिवासी साहित्य संमेलन, दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी युवक युवती साहित्य संमेलन ही त्यांतली काही नावे. १९८९साली भरलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण माने होते.

                                               

एकसष्ट अलंकार (साहित्य शास्त्र)

एकसष्ट अलंकार - २० विशेषोक्ति, ४८ अधिक, २५ व्याजस्तुति, ३० काव्यलिंग, ४७ विषम, ५२ स्मरण, ७ अपह्लुति, ३८ परिसंख्या, ४६ सम, २७ विनोक्ति, १५ दीपक, ५९ व्याघात, ५४ प्रतीप, ३७ व्याजोक्ति, ५ ससंदेह, ३५ अनुमान, ५५ सामान्य, ५० मीलित, ५३ भ्रांतिमान्, ४० अन्योन्य, २१ यथासंख्य, ५७ तद्‌गुण, ३४ पर्याय, १४ द्दष्टांत, ३२ उदात्त, २ अनन्वय २४ स्वमावोक्ति, १ उपमा, २८ परिवृत्ति, ९ समासोक्ति, ६० संसृष्टि, आणि ३१ पर्यायोक्त, ४३ सार, ३ उपमेयोपमा, २६ सहोक्ति, ६ रूपक, ४४ असंगति, ५८ अतदगुण, ६१ अंगांगिसंकर, १८ आक्षेप, १९ विभावना, ४१ उत्तर, २३ विरोध, ३६ परिकर, ११ अप्रस्तुतप्रशंसा, ८ श्लेष, ५६ विशेष, ४९ प्रत्यनीक, २२ ...

                                               

कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.

                                               

कॅथार्सिस

कॅथार्सिसचा सिद्धांत साहित्य व सौंदर्यशास्त्रातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत इ.स. पूर्व २०० वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने त्याच्या पोएटिक या ग्रंथात मांडला होता. शोकांतिकेच्या आस्वादाच्या प्रक्रियेचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण हा सिद्धांत करतो.

                                               

गंगासती

गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ते १४ व्या शतकादरम्यान राजपारा गावातील राजपूत कुटुंबात झाला.विवाह कहळुभा गोहेल याच्याशी झाला. कौटुंबिक संस्काराने लहानपणापासून भक्तिमार्गाकडे वळलेल्या गंगाबाईने आपल्या पतीलाही भक्तिमार्गाची गोडी लावली. पुत्र वयात आल्यावर आपले आयुष्य भक्तिमार्गाला समर्पित केले. पतीने स्वेच्छेने समाधी स्वीकारल्यावर गंगाबाईनेही ४३ व्या दिवशी समाधी घेतली. मधल्या बेचाळीस दिवसात आपली पुत्र वधु पानबाई/फुलबाई हीलाही रोज भजन ऐकवत भक्तिमार्गी शिकवण दिली. तिची ह ...

                                               

ग्रंथालय

ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळ ...

                                               

जयपूर साहित्य उत्सव

जयपूर साहित्य उत्सव हा जयपूर मध्ये साजरा होणारा साहित्य उत्सव आहे. जानेवारी महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. याचा कालावधी पाच दिवस असतो. हा उत्सव दिग्गी राजवाड्यात भरवला जातो. या उत्सवाची मूळ कल्पना फतेह सिंह यांची आहे. हा जयपूर विरासत फाउंडेशन द्वारे आयोजित केला जातो.

                                               

दिवाळी अंक

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. दिवाळीअंक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणार्‍या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात. मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता. सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीच्या दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या ज ...

                                               

नाट्य शास्त्र

नाट्यशास्त्र नाट्यशास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान ह्याची निर्मिती झाल्याचे कळते. भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात. भरत मुनींनी संस्कृतमध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागांत विभागणी केली आहे. भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे. हे रस भारतीय नाट्याच्या आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यांवर त्यांचा प्रभाव आहे. भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराचेही भरतमुनीच ...

                                               

नियतकालिक

नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात. नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा० मासिक - दर महिन्याला वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक - दर आठवड्याला षण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी द्वैवार्षिक - दोन वर्षांतून एकदा निघणारे दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन. द्विसाप्ताहिक - आठवड्यातून दोनदा द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अन ...

                                               

साहित्याची निर्मितिप्रक्रिया

साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा व भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही काळात व खंडात निर्मितिप्रक्रीयेचा अभ्यास केला जातो. ही परकीय लेखकाला बीज स्फुरते तेथपासून कि लेखक लिहित असतो तेथपासून सुरु होते, या विषयी अभ्यासकांत मदभेद आहेत. त्यामुळे या प्रक्रियेचे स्वरूप गुंतागुंतीचे मानले जाते.साहित्याच्या-आकलना आस्वादासाठी मात्र निर्मितिप्रक्रियेचा अभ्यास उपकारक ठरत असतो.

                                               

पुस्तक

पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते.त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका तावास वा कागदास पान म्हणतात. तर त्या पानाच्या पुढच्या बाजूस मुखपृष्ठ असे म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात.EGYPT मध्ये ALEXANDRIA येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी मोनोग्राफ म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखि ...

                                               

बाल साहित्य

बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे ’ॲलिस इन्‌ वंडरलॅन्ड, मार्क ट्वेनचे ’टॉम सॉयर’ आणि ’ॲडव्हेन्चर्स ऑफ हकरबरी फिन’, फिलिपा पिअर्सचे ’मिडनाईट गार्डन’, इ. यांशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉइज, नॅन्सी ड्‌ऱ्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. मराठी ...

                                               

भरताचे नाट्यशास्त्र

ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचे मुनी होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेवर एक ३६ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, ब्रह्मदेवाने नाट्यवेद नावाचा पाचवा वेद निर्माण केला. त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आले. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने भरतमुनींना त्याचा पृथ्वीवर प्रसार करण्यास सांगितले. शिवाने भरतमुनीचे नाट्य बघून, आपला शिष्य तंडू यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धान्त कथन करण्यास पाठवि ...

                                               

मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश

भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद येथे असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादला स्थलांतर झाले. त्यामुळे हैदराबादमधील मराठी साहित्यिक वातावरण विचारात घेऊन येथे इ.स. १९५८ मध्ये ’मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश’ या संस्थेची स्थापना झाली. हे करण्यात न्यायमूर्ती गोपाळराव एकबोटे, प्रा. रा.ब. माढेकर, प्रा. भा.शं. कहाळेकर,प्रा. र.म.भुसारी, डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, श्री. दिवाकर कृष्ण केळकर आदी मंडळी आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग होता. ही मंडळी वेगवेगळ्या व्यवसायात होती आणि महाराष्ट्र मंडळ, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी ग्रंथ संग्रहालय आदी संस्थांमध्ये विश्वस्त किंवा पदाधिकारी होती. ...

                                               

मालगुडी डेज

मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जात ...

                                               

मासिक

मासिक म्हणजे मुद्रित अथवा इलेक्ट्रोनिकरित्या इन्टरनेटवर प्रकाशित दर महिन्यास प्रकाशित होणारे नियतकालिक होय. पूर्वी मासिक मुदित असे परंतु हल्ली अनेक मासिक हे आंतरजालावर प्रकाशित होत असतात. सामान्यत: मासिएक नियतकालिक प्रकाशन आहे हे, छापलेली किंवा इलेक्ट्रॉनिकरित्या प्रकाशित. सामान्यत: मासिकात विविध प्रकारची जाहिरातीद्वारे, खरेदी किंमतीने, प्रीपेड सबस्क्रिप्शनद्वारे, किंवा तीनांचे संयोजन करून वित्तपुरवठा करतात. लेखी प्रकाशन बाबतीत, हे लेखी लेखांचे एक संग्रह आहे.

                                               

विज्ञानकथा

विज्ञानकथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा. विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात ...

                                               

वेध (पुस्तक)

वेध: बाबाचं मला सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे वेध! हे त्याचं पहिलं वहिलं आणि आतून आलेलं लिखाण. त्याच्या गद्धेपंचविशीत पोटतिडकीनं लिहिलेले लेख. आपल्या लिहिण्यानी कुणाला काय वाटेल याचं अजिबात ओझं न घेता बेधडकपणे लिहिलेलं. आणि त्यामुळेच मनाला भिडणारं. लोकमान्य नगर मधे शेजारी रहाणारे ‘सकाळ’चे जेष्ठ पत्रकार मो. स. साठे ह्यांनी बाबाला लिहायला प्रोत्साहन दिलं. ‘जसं सांगतोस तसं लिहायचं’ असं सांगितलं. सुरवातीला काहींनी बाबाच्या लिखाणावर ‘शैली नसलेली शैली’ अशी टिपण्णी केली; पण हळूहळू ती ‘अनिल अवचट’ शैली बनून गेली. आणि त्या ‘जणू-वाटे-गमे-भासे’च्या काळात ती शैली जास्तच उठून दिसली. तेव्हाचे बोली भाषेतल ...

                                               

समीक्षा

मराठी शाब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय.एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मराठीत टीका असाही शब्द योजला जातो. ग्रंथांशिवाय, नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य अशा कृतींचेही समीक्षण केले जाते. अर्थव्यवहारात कंपनीची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, उत्पादने इत्यादींची समीक्षा केली जाते. क्रीडा क्षेत्रातील समीक्षेस मराठीत समालोचन असे म्हणतात. समीक्षा ही नेहमीच कमी शब्दांत असते व तिने तसे असण्यातच तिच्या अस्तित्वाला अर्थपूर्णता लाभते. १९६०ते ...

                                               

साहित्याचे प्रयोजन

डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या मते, कलावंत कशासाठी कला निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतूने तिचा आस्वाद घेतो, स्वीकार करतो या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोजनविचार महत्त्वाचा आहे. कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नाही, त्यामुळे तिच्या निर्मितीचे प्रयोजन ही गोष्ट गुंतागुंतीची आहे. त्यामुळे प्रयोजनाचा विचार कलानिर्मितीमधील महत्त्वाचा विचार आहे.१ साहित्याच्या प्रयोजनाचा विचार प्राचीन आणि आधुनिक साहित्यशास्त्रात सातत्याने चर्चिला गेला आहे. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. कवी वा लेखक कोण्या हेतूने उद्देशाने लिहितो, व वाचक कोणत्या हेतूने वाचतो हा निर्मितिप्रक्रियेतील व आस्वादप्रक्रियेतील महत्त ...

                                               

हेमा टोबियम जी

डॉ.रा.कृ. गाडगीळ ऊर्फ हेमा गाडगीळ यांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावात आढळणाऱ्या ’सिस्टोसोमिया हिमा टोबियम’ नावाच्या एका असाध्य रोगावर संशोधन करून एक लस शोधून काढली. त्या प्रयत्नांची हकीकत आणि डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्य प्रवासाची सांगितलेली साध्या व रसाळ भाषेतील ही सरस आत्मकथा आहे.

ई-पुस्तक
                                               

ई-पुस्तक

ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररुपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.

                                               

बागुलबुवा

बागुलबुवा म्हणजे एक काल्पनिक पात्र ज्याचा वापर लहान मुलांना भिती दाखविण्यासाठी होतो.या पात्रास दाढी, मोठ्या मिश्या असतात असे कल्पिलेले असते व हे पात्र लहान मुलांना पकडुन नेते अशी भिती त्यांना दाखविण्यात येते. मराठी साहित्यात बागुलबुवा हा शब्द भिती दाखविणे अश्या अर्थाने योजिल्या जातो. याच नावाचे मराठी भयकथा साहित्य प्रसिद्ध करणारे युट्यूब चॅनल देखील आघाडीचे लोकप्रिय चॅनेल प्रगती पथावर आहे.

                                               

लाल किताब

लाल किताब हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दू व फारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.

साहित्यातील नोबेल पारितोषिक
                                               

साहित्यातील नोबेल पारितोषिक

साहित्यातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पारितोषिकांपैकी एक आहे. साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक इ.स. १९०१ साली सली प्रुडहॉम ह्या फ्रेंच कवी व लेखकाला देण्यात आले. १९१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक रविंद्रनाथ टागोरांना देण्यात आले होते. आजतागायत भारतीय साहित्यिकाला मिळालेले हे एकमेव नोबेल आहे. ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम शहरात केले जाते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →