Back

ⓘ गायीच्या प्रजाती ..                                               

अमृतमहाल गाय

अमृतमहाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून कर्नाटक राज्यात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातीचा बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहे. ही प्रजाती हल्लीकर पासून निर्माण झालेली आहे. प्राचीन काळी यांचा वापर युद्ध क्षेत्री साहित्याची ने-आण करण्यासाठी होत असे. यांची काम करण्याची चांगली क्षमता आणि वेगवान गती यासाठी हे बैल वापरले जातात. प्राचीनकाळा पासून गोला आणि हल्लीकर जमातींनी या प्राण्यांची पैदास आणि संवर्धन केले. त्याच सोबत विजयनगर चे तत्कालीन महाराज चिक्कदेवराय वोडियार, सुलतान हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी दिलेला राजाश्रयसुद्धा यसंवर्धनास कामी आला. जास्त वेळ काम, कमी चारा -पाणी अशा प्रतिकूल ...

                                               

उंबलाचेरी गाय

उंबलाचेरी, उंबळाचेरी किंवा उंब्लाचेरी हा शुद्ध भारतीय पशुगोवंश असून, तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम व तिरुवरूर जिल्ह्यातील तटीय क्षेत्रात आढळतो. दरम्यानच्या काळात ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मध्यम उंची, कष्टकरी वृत्ती व ४.९ % पर्यंत फॅट असलेली मध्यम दुधाळू गाय यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे. चांगला खुराक दिल्यास ही गाय दिववसाला २ ते ४ लिटर दुध देते. परंतु मजबूत, मध्यम बुटका आणि काटक पाय यामुळे भातशेती मध्ये प्रजातीचे बैल चांगलं कामाला येतात. आणि यामुळेच हा गोवंश तामिळनाडूत प्रसिद्ध आहे.

                                               

कंगायम गाय

कंगायम किंवा कंगेयम हा शुद्ध देशीगोवंश असून हा मुुख्यतः तामिळनाडू मध्ये आढळतो. तामिळनाडूतील त्रिपुर जिल्ह्यातील कंगेयम गावावरून याचे नाव कंगायम असे पडले. हा गोवंश कोंगुमाडू या नावाने पण ओळखल्या जातो. शारीरिक लक्षण- हा मध्यम उंच ते बुटका गोवंश असून हा पांढरा, तपकिरी, लाल व काळ्या रंगात आढळतो. यात उंचीनुसार दोन गोवंश आढळतात. बुटका-छोटे पण काटक पाय, लहान आणि मागे वळून टोकं बाहेर असलेले शिंग. सरळ आणि टोकदार कानं. डोळ्याभोवती काळे वर्तुळ असा वर्ण आढळतो. मध्यम उंची-मध्यम काटक पाय, लांब टोकदार आणि पाठीमागे बाहेर जाऊन परत टोकं आत वळलेले शिंग. सरळ टोकदार कानं. काळे आणि ठळक डोळे असा वर्ण आढळतो. या प ...

                                               

कासारगोड गाय

कासारगौड, कासारगोड किंवा साह्य हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून केरळ आणि कर्नाटकात आढळतो. याचे उगमस्थान दक्षिण सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला साह्य पशु असे सुद्धा म्हणतात. कर्नाटकातील गौड जिल्ह्यावरून याचे नाव कासारगौड असे पडले. हा मध्यम बुटका गोवंश असून उत्तम प्रतीच्या दुधासाठी ओळखला जातो. याला केरळातील अति पर्जन्यमान, उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. याची उत्पत्ती कोकण कपिला आणि सुवर्ण कपिला पासून झाली असे मानल्या जाते. शारीरिक रचना- याचा रंग बहुतांश काळा असून काही वेळा तपकिरी सुद्धा दिसून येतो. शिंगे मध्यम लहान, कानं आडवे टोकदार आणि तीक्ष्ण असतात. शेपटी लांब आणि जवळजवळ जमिन ...

                                               

कृष्णा गाय

कृष्णा गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८० नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट जमिनीच्या मशागतीसाठी तत्कालीन मराठा राजांनी गीर, कांकरेज आणि ओंगल या भारतीय गोवंशाच्या देशी संकर आणि निवड पध्दतीने या गोवंशाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. हा गोवंश अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या भारतीय गोवंशापैकी एक आहे.

                                               

केनकाथा गाय

केनकाथा/केनकथा किंवा केंकाथा हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश राज्यातील महत्वपुर्ण गोवंश आहे. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड प्रांतातील केन नदीच्या काठावर उगमस्थानामुळेच या गोवंशास केनकाथा असे नाव पडले आहे. या गोवंशास काही ठिकाणी केनवारीया असेही म्हणतात. हा गोवंश डोंगराळ भाग व उग्र वातावरणात टिकून राहणारा गोवंश म्हणून ओळखला जातो. हा गोवंश मध्यम दूधारू आहे. या गोवंशचे बैल लहान परंतू अत्यंत बळकट असतात, तसेच ते जडकामासाठी फार उपयुक्त असतात. या गोवंशाच्या गायीचे दुधाचे उत्पादन १ ते ३ लिटर प्रतिदिन पर्यंत असते. हा गोवंश मध्य प्रदेशातील विंध्या पर्वताच्या परिसरात, पन्ना, छतरपूर आणि टीकमगड जिल ...

                                               

कोसली गाय

कोसली किंवा कोसाली हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा प्रामुख्याने छत्तीसगड राज्यातील मध्यवर्ती मैदानावर आढळणारा गोवंश आहे. छत्तीसगडच्या मैदानी प्रदेशाला पूर्वी कोशल असे म्हणत असत आणि त्यावरून या गोवंशाला कोसली असे नाव पडले. हा गोवंश मुख्यतः रायपूर, दुर्ग, राजनांदगांव, बिलासपूर, जांजगिर-चांपा, या जिल्ह्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आढळतो.

                                               

खिल्लार गाय

खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये जास्त आढळते. या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात. या गाईंमध्ये प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत - पंढरपुरी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, काजळी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार इत्यादी. या गोवंशाच्या गाई इतर गोवंशापेक्षा दूध कमी असते अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा ...

                                               

खेरीगढ गाय

खेरीगढ/खेरीगड हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश मधील प्रमुख गोवंश आहे. हा गोवंश खेरी जिल्हातील खिरीगड प्रांतात आढळतो. यामुळेच या गोवंशाला "खेरीगड", "खिरीगड" किंवा "केरीगड" असे नाव पडले. याच सोबतच पीलीभीत, शहाजहापूर, सीतापूर, जिल्हांमध्ये तसेच पऱ्हेर, मांजरा या विभागात, तरईच्या क्षेत्रात पण हा गोवंश आढळतो. हा गोवंश खास करून कष्टाच्या कामासाठी, ओझे वाहून नेणे व तत्सम अवजड कामांसाठी वापरला जातो. हा गोवंश अतिशय परिश्रम करणारा गोवंश म्हणून प्रसिद्ध आहे. अशा कष्टाच्या कामांमुळे या गोवंशाचे बैल खुप खादाड असतात. या गोवंशाच्या गायी फारशा दुधारू नसतात. शारीरिक रचना- हा गोवंश प्रामुख्याने पांढऱ् ...

                                               

गंगातिरी गाय

गंगातिरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून याची उत्पत्ती गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभागातील पट्ट्यातील आहे असे मानल्या जाते. याला पूर्वी शहाबादी किंवा हरियाना नावाने सुद्धा ओळखल्या जात असे. पांढरा शुभ्र रंग आणि गंगा किनारी याचा आढळ असल्याने याला गंगातिरी असे नाव पडले. हा गोवंश उत्तरप्रदेशच्या चंदौली, गाझिपूर व बलिया जिल्ह्यात, तसेच वाराणसी, मिर्झापूर, भोजपूर, रोहतास भागात आणि बिहारच्या शहाबाद, भभुआ, बक्सर, अरहा, छपरा भागात मोठ्याप्रमाणात आढळतो.

                                               

जवारी गाय

जवारी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा उत्तर कर्नाटक मधील हैद्राबाद कर्नाटक तसेच हुबळी, विजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतो. हा गोवंशन स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असल्यामुळे कल्याण-कर्नाटक प्रांतात याची संख्या कमी जास्त दीड ते दोन लाख पर्यंत आहे.

                                               

डांगी गाय

डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे.

                                               

थारपारकर गाय

थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने पण ओळखले जाते. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

                                               

धन्नी गाय

धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.

                                               

नागोरी गाय

नागोरी किंवा नागौरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून, राजस्थानामधील एक उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. मुख्यतः नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा यांच्या परिसरात हा गोवंश आढळतो. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान राजस्थानातील सुहालक प्रदेश नागौर आहे.

                                               

निमारी गाय

निमारी किंवा निमाडी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. हा गोवंश गीर आणि खिल्लारी या दोन भारतीय गोवंशाच्या संकरातून निर्माण केल्या गेलेला आहे.

                                               

पुंगनुर गाय

पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो.

                                               

पोंवार गाय

पोंवार किंवा पोनवार हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा मुख्यतः उत्तरप्रदेश राज्यातील एक महत्वाचा गोवंश मानला जातो. या गोवंशाला पूर्णिया किंवा काबरी नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील यादव आणि पासी समाजाकडून जास्त पालन केले जाते. या गोवंशाचे गोवंशाचे उत्पत्तीस्थान उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील पूरणपूर तालुक्यातील पोनवार याठिकाणी या आढळते. पीलीभीत, लखीमपूर, खेरी या जिल्ह्याच्या आसपास हा गोवंश पाळला जातो.

                                               

बरगूर गाय

बरगूर किंवा बरगुरू हा शुद्ध भारतीय गोवंश आहे. हा मुख्यतः पश्चिम तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील अंथियुर तालुक्यातील बरगूर पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतो. नीट निगा राखल्यास बरगूर गाय दिवसाला तीन लिटरपर्यंत दूध देऊ शकते. ग्रामीण भागात या गायीचे दूध आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

                                               

मलनाड गिड्डा गाय

मलनाड गिड्डा किंवा मलेनाडू गिड्डा हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः कर्नाटकच्या पहाडी भागात आढळतो. या गोवंशाचा उगम शिमोगा या उत्तर कर्नाटक प्रांतातील आहे असे मानले जाते.

                                               

मालवी गाय

मालवी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः पश्चिमी मध्यप्रदेश च्या माळवा प्रांतात आढळतो. या गोवंशाला स्थानिक भाषेत मंथनी किंवा महादेवपुरी असे सुद्धा म्हणतात. मालवी गोवंशाचा आगर, जिल्हा शाजापूर, मध्यप्रदेश येथील शासकीय पशु संगोपन केंद्रावर जवळपास ५० वर्षे बारकाईने अभ्यास केला गेला. हा गोवंश मध्यप्रदेश मधील एक महत्त्वाचा गोवंश असून, इंदूर, देवास, उज्जैन, मंदसौर, राजगड, रतलाम आणि शाजापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.

                                               

लाल कंधारी गाय

लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.

                                               

लाल सिंधी गाय

                                               

वेचुर गाय

वेचुर किंवा वेच्चुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः केरळात आढळतो. याचा उगम केरळातील गाव वेचुर, ता.वैकम, जिल्हा कोट्टायम येथील असल्यामुळे या गोवंशाला वेचुर हे नाव पडले. धवलक्रांती किंवा दुग्ध क्रांतीच्या लाटेत भारतात मोठ्या प्रमाणात संकर सुरू झाले आणि हा गोवंश नष्ट होण्याच्या मार्गाला लागला. परंतु वेळीच सावध होऊन केरळ कृषी विद्यापीठाच्या टीमने याचे जतन आणि संवर्धन केल्यामुळे या गोवंशाचे अस्तित्व टिकून आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार हा जगातील सर्वात बुटका गोवंश आहे.

                                               

साहिवाल गाय

साहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे. उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे. दूध आणि शेतीकामासाठी बैल यासाठी उपयुक्त आहे.

                                               

हरियाना गाय

हरियाना गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

                                               

हल्लीकर गाय

हल्लीकर हा कर्नाटकात आढळणारा गोवंश असून याचा शेती आणि कष्टाच्या कामासाठी चांगला उपयोग होतो. बैलाचा उंच खांदा, लांब आणि पाठीमागे, आत वाळलेली शिंगे, मोठं डोकं, काटक आणि उंच शरीर, राखाडी आणि कधीकधी काळा रंग ही या गोवंशाची ओळख आहे. अमृतमहाल प्रजातीची निर्मिती यांच्या पासून झाली असे म्हणतात. अमृतमहाल सोबतच या प्रजातिला राजाश्रय मिळाला होता. टिपू सुलतानाने इंग्रजांच्या विरोधातील लढाईत सामान वाहून नेण्यासाठी या प्रजातीचा वापर केला होता. मैसूर, तुमकुर हसन या प्रांताला हल्लीकर म्हणून ओळखले जाते. आणि याच प्रांतात ही प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. आणि यावरूनच यांचं नाव सुद्धा हल्लीकर असे पडले. ...

ओंगल गाय
                                               

ओंगल गाय

ओंगल गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचं मूळ आंध्रप्रदेशातील प्रकासम जिल्ह्यातील ओंगल या गावातील आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कधीकाळी ही प्रजाती खूप प्रसिद्ध होती. विशेष करून जलीकट्टू या खेळासाठी या प्रजातीचे सांड वापरले जात असत. यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि मजबूत अंगकाठी मुले या प्रजातीचे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

कांकरेज गाय
                                               

कांकरेज गाय

कांकरेज गाय हा एक भारतीय गोवंश असून गुजरात मधील कच्छचे रण आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ही गाय तलवड, वाघियार, वागड आदित्यादी विविध नावाने ओळखली जाते. कांकरेज नावाने ही पाकिस्तानात पण प्रसिद्ध आहे. यांची दूध देण्याची क्षमता उत्तम असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

                                               

कोंकण कपिला गाय

कोंकण कपिला हा शुद्ध भारतीय गोवंश असून मुख्यतः महाराष्ट्रातील कोंकण प्रांत, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात आढळतो. ही साधारण उंचीची, बुटकी जात असून शेतीकामासाठी उपयुक्त आहे.

गवळाऊ गाय
                                               

गवळाऊ गाय

गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे. हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे.

गीर गाय
                                               

गीर गाय

गीर गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर प्रतिदिन आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४०-५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे. अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे.

देवणी गाय
                                               

देवणी गाय

देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →